Parimal Digital
GetStarted
Login
  • Login
    Enable Location Services
    • Website
    • परिमल
    • परिमल स्तोत्र
    • श्रीमदभगवद्गीता
    • पूजनीय गुरुजन
    • Others

    Others

      Parimal Digital
      Parimal Digital
      Login
      • Login
      • Website
      • परिमल
      • परिमल स्तोत्र
      • श्रीमदभगवद्गीता
      • पूजनीय गुरुजन
      • Others
      GetStarted
      ऋद्धिपूर मध्यान्ह पूजावसर

      ऋद्धिपूर मध्यान्ह पूजावसर

      1. Home
      2. परिमल स्तोत्र
      3. पूजावसर
      4. ऋद्धिपूर मध्यान्ह पूजावसर

      ऋद्धिपूर मध्यान्ह पूजावसर


      श्रुंगार सर्व बरवा, बरवी पूजाही ।

      स्वीकारुनि विहरणा प्रभुराज जाई ।

      एकीकडे भट दुजी महादाइसा ती ।

      स्कंधावरी सुशिबिका नितही वाहाती ॥ १ ॥

      तो कोथळा सुशिबिकारुढ स्वामियाची ।

      सेवा करी धरुनिया चवरी स्वहस्ती ।

      जाउनि आपविहिऱ्या प्रभुजी गुढ्यासी ।

      वाकी- सुशोभितपदे संबंध देती ॥२॥

      ते पापपिंपळ जिथे प्रभु नित्य जाती ।

      हस्ते पदे प्रतिदिनी संबंध देती ।

      तेथौनि दाभविहिरी नगरांत क्रीडा

      ।ोई प्रवृत्तिवश त्या स्वच्छंदलीळा ॥३॥

      दाभेरिये क्रीडुनिया परतौनि येता ।

      पोमाइदत्त उदका स्वीकरी सुदाता ।

      प्रस्थान तेथुनि प्रवृत्तिवशे कृपाळा ।

      लीळा बहुविध पुरांत करावयाला ॥४॥

      देवालयी प्रतिगृही मढमंदिरी तो ।

      स्वच्छंद क्रीडुनि पवित्र तया करीतो ।

      येता पुरांत चरणी तुळशी वाहाती ।

      श्रद्धान्विता सुवनिता नित भक्तजाती ॥५॥

      ऐसे विहार करुनि प्रभु सौख्यराशी ।

      तो येतसे अनुचरासह स्वगृहासी ।

      मध्यान्हकाळ पुजना स्विकरौनि स्वामी ।

      भक्तीजनास करि तृप्त नित तृप्तकामी ॥६॥

      पूजेपुढा अवसरु आरोगणेचा ।

      जेथे स्विकार प्रभुला शुभभावनेचा ।

      आबाइसाविण कुणी करिता ती सेवा ।

      की जीवधर्म कधिही नच मान्य देवा ॥ ७ ॥

      आरोगणासमयी तो प्रभु आग्रहाने ।

      पेंडाळु भाकर अळर्कवसादि मागे ।

      आंबे वृतांक मधुकाकडी वोंबियांनी ।

      प्रसन्नता स्विकरिजे जणु तृप्तका ॥८॥

      आरोगणेतील तळीव लाडु पुरिया ।

      जाती प्रसाद म्हणुनि जगळाख्य राया ।

      चावीरिया थुकरिया शुभकर्दमाचा ।

      भक्तांसि लाभत असे सुप्रसाद साचा ॥९॥

      तक्रोदना स्विकरिती नित भोजनान्ती ।

      तक्रांजली लुखिसहोदर माइल्यासी ।

      ऐशा अतीव सुरसा विविधा पदार्थी ।

      आबाइसा करितसे प्रभुदास्य प्रीती ॥१०॥

      ते दास्य ते भजनही मजला घडावे ।

      ती योग्यता करुनिया मज उद्धरावे ।

      प्रार्थितो प्रभुवरा तव पादपद्मी ।

      द्या प्रेम ही विनवणी परिसौनि स्वामी ॥ ११॥

      त्या सावळापुरिचिया दुहितेप्रमाणे ।

      आप्तृत्व ते उरवले नच अद्धमाने ।

      हे जाणतो तरिहि मी मम मायबापा ।

      द्या प्रेम हेच विनवी विसरौनि पापा ॥ १२ ॥

      औदास्य जे परिहरू शकली ना खोडी ।

      साधेस त्या बघुनि ते औदास्य सोडी ।

      तीतेचि दाढ नख केशकलाप फोडी ।

      तैसी घडो कणवी मजलाही थोडी ||१३||

      ऐशा सुरेख प्रभुजी ! तुझिया सुलीला ।

      की पूर येई स्मरता नयनी सलीला ।

      स्वीकारिजो कवन हे पुरवूनि आर्ती ।

      यावी नरेशहृदयात परेशमूर्ती ॥ १४ ॥

      मालिनी

      जय कृतबहुमुक्ती सुंदरानंत शक्ती ।

      जय विकसितविद्या, घोर संसारवैद्या ।

      जय जगभरिता श्रीकृष्णराया विमाया ।

      जय तिलकतसृष्टी पाहि मां प्रेमदृष्टी ॥ १४ ॥

      जय सुकृत सुकाळा मोक्षमार्गादिमुळा ।

      जय हतभवदोषा चारु मायांगवेषा ।

      जय धृतपळभारालर्कताप प्रहारा ।

      जय युगचयटीळा तूचि दत्ता सुलीळा ॥१५॥

      जय जगचयबीजा गोमतीक्षिप्तपुंजा । 

      जय करधृतसूर्पा मार्जनी चिन्हऋणा ।

      जय विगलितसंज्ञा चक्रपाणी मनोज्ञा ।

      जय वर सुखदानी तूचि आम्हा निदानी ॥ १६ ॥

      जय सुरवर वैद्या जीववैद्यानुवैद्या ।

      जय परमविलोका रक्षिता शेषलोका ।

      जय विमलभवारी चिद्रमेशावधारी ।

      जय विहरतशक्ती तू परासेव्य भक्ती ||१७||

      जय परमनिधाना मोक्षदानावसाना ।

      जय शुकनवनेत्रा चंडविरार्जवक्त्रा ।

      जय निरामय धामानंतधानंतनामा ।

      जय भवभयनाशा चक्रपाणी परेशा ॥ १८ ॥

      जय सुभगचरित्रा जीवतीर्था पवित्रा ।

      जय विबुधशरण्या क्षाळिताद्यौघपुण्या ।

      जय सुखनिधिमूर्ती केवलापारकीर्ती ।

      जय विविधविहारा तू परानंदहीरा ॥ १९ ॥

      जय सकळसमाना ज्ञानिभक्ताभिमाना ।

      जय विगलितविवादा सृष्टीमूळादिकंदा । जय

      मधुरकटाक्षा ब्रह्मविद्या सुभैक्षा ।

      जय बहुविध वेधा फेडि संसारबाधा ॥२०॥

      अधिकसमविहिन क्षेम पै वोद्वितिये

      प्रथम परमपूज्यामाजि लाभैकसीमा ।

      न पुसवे हि वेत्ते ब्रह्म सांगो न जाणे ।

      परतरहित जीवा स्थान चांपेलगौरा ॥ २१ ॥

      खुलुरि परधनाची दैवसंकेत ठावो ।

      सकळ गुणगणांचे दीप मोक्षैकधाम ।

      वर मुनिवर देवानंदसाम्राज्यतारू ।

      विदितभरित मुक्ती गुर्जर ब्रह्म जाणे ||२२||

       

      इति श्रीपरधर्मे महामोक्षैक साधने श्रीनागार्जुनोपदेशे श्रीकवीश्वरबास विरचित जयाष्टक तथा श्रीनरेंद्रमुनि अंकुळनेरकर विरचित ऋद्धपूर मध्यान्हकाळ पूजावसर स्तोत्र संपूर्णम् ॥

      Parimal Digital
      Vishal Shri Geeta Bhawan
      Sector 52, Chandigarh
      160036
      Chandigarh, India
      Working Hours
      Monday-Friday
      10am-6pm
      Click to Follow
      Contact Us
      [email protected]+91-8146148002+91-9877426467
      Copyright © 2024. All Rights Reserved.
      Designed By: Keshav Mahajan