Parimal Digital
GetStarted
Login
  • Login
    Enable Location Services
    • Website
    • परिमल
    • परिमल स्तोत्र
    • श्रीमदभगवद्गीता
    • पूजनीय गुरुजन
    • Others

    Others

      Parimal Digital
      Parimal Digital
      Login
      • Login
      • Website
      • परिमल
      • परिमल स्तोत्र
      • श्रीमदभगवद्गीता
      • पूजनीय गुरुजन
      • Others
      GetStarted
      ऋद्धिपूर पूजावसर

      ऋद्धिपूर पूजावसर

      1. Home
      2. परिमल स्तोत्र
      3. पूजावसर
      4. ऋद्धिपूर पूजावसर

      ऋद्धिपूर पूजावसर

      शार्दूलविक्रीडित

      कंदर्पादिकदर्पकंदनकरा गोवर्धनाद्रि धरा ।

      शार्दूलाद्रि मनोहरात्रिकुमरा जो वंद्य सुरासुरा ।

      श्रीद्वारावती सूर्पमार्जनीधरा, श्रीगुंडमाख्या नमो ।

      सर्वज्ञा अतिसुंदरा प्रभुवरा, पंचावतारा नमो ॥१॥

      वसंततिलका

      अव्यक्त वस्तु सुरनिर्जर नेणति ते ।

      तो देव केवि उमगे मदिया मतिते ।

      ऐसे असौनि तरीही श्रुतशास्त्रसाये ।

      सधैर्य होत मजला करण्यास काव्ये ॥२॥

      नांदे विदर्भनगरी प्रभु गुंडमाख्या ।

      देई जीवास सुख, फेडुनि जो अविद्या ।

      सर्पानिमित्त प्रभु राजमठास येई ।

      तेथेचि त्या प्रभुवरा नितवास होई ॥३॥

      होई प्रभातसमयी उपहुड देवा ।

      आबाइसासि पुसता करी तिही सेवा ।

      रायांगणी करी बीजे सहकोथळोबा ।

      तो रूपदेव प्रभुचा करी चांगबोला ॥ ४॥

      तो कोथळा प्रभुप्रति तळउपराते ।

      तै जाणवीत धरुनि शुभदीप हाते ।

      वेढे करी प्रभु पुन्हा परतौनि येई ।

      त्यानंतरे स्वीकरी मर्दन मादनेही ॥५॥

      संमार्जनोदक सदा त्रिपुरारी सारी

      ।्यावांचुनी इतरदत्त प्रभु ना स्वीकारी ।

      तै कोथळा प्रभुसी मर्दन मादने दे ।

      की भावभक्ती परिपूर्णचि सेवना ते ॥६॥

      यज्ञोपवित करीअर्पण त्रिपुरारी ।

      त्या हातुनिच प्रभुही नित ते स्वीकारी ।

      मातंगत्रिवडी सदा स्वीकरीमुरारी ।

      कै जोगनायक समर्पित वस्त्रधारी ॥७॥

      दिव्यांबरी सजविले प्रभुकारणे जे ।

      पै अंबकासि जणु की करी पारणे जे ।

      ते दिव्य आसन सुशोभित जे फुलांनी ।

      होई अधिकचि पवित्र प्रभुपाउलांनी ॥८॥

      ते दिव्य तांब्रकलश द्वय बाजूलाही ।

      आदित्य ते तळपते गमति जनासि ।

      ती मेघडंबरी गमे तिज पाहुनिया ।

      की शेष छत्र धरितो जड होउनिया ॥ ९ ॥

      कापूर कस्तुरीत कुंकुम केशरादि ।

      तो यक्षकर्दम सदा स्वीकरी अनादि ।

      ओंकारु त्यास म्हणुनी करी खेळ काही ।

      सर्वज्ञ जो स्विकरी तोच अजाणता ही ॥१०॥

      कोणी जवादी भरी केशकलापभागी ।

      सेवा घडे न मज ती खलु मी अभागी ।

      खोपा करुनि विरगुंठीस बांधता ती ।

      श्लेष्मा म्हणुनि पुसतो वयनोदधी ती ॥११॥

      अर्पी महींद्रभट श्रीचरणास वाकी ।

      जो पै प्रसन्न करतो नित माधवा की ।

      जैतोषुनी प्रभुवरे पद आदळावे ।

      तै वाकीने घवघवे जणु गीत गावे ॥१२॥

      तोडोनि तै प्रभु तिला जणु मुक्ती देती ।

      जोडोनि ये पुनरपि धरि श्रीपदे ती ।

      त्या सांखळे प्रभुवरा नितखंत येई ।

      जे खंतीचा जीव कुणी जणु तेथ राही ||१३||

      आडा ललाटी अतिसुंदर चंदनाचा ।

      की तो सुगंध परिपूर्णचि चंद्रसाचा ।

      जो सोमकांत द्रववी निववी लतांसी ।

      आला स्वये द्रवुनिया अनुलेपनासी ॥ १४ ॥

      श्रीकंठ शोभुन दिसे अशी दिव्य माला ।

      सौदामिनी जणु समर्पिली श्रीअजाला ।

      कर्णी झळंबुक सुनिर्मित जे फुलांनी ।

      घेई स्विकार करुनि कैवल्यदानी ॥ १५ ॥

      श्रीहस्तपद्म विलसे फुलमालिकांनी ।

      ती मालिकाही विलसे श्रीकरांबुजांनी ।

      ते दृश्य पाहुनि मुनिजन तोखती ते ।

      सारे स्वकीय नयनी रस चाखती ते ॥ १६॥

      तो पुष्पगुच्छ प्रभुच्या करपंकजाने ।

      झाला सुशोभित पहा धरिता अजाने ।

      धूपारती प्रभुस ती निजभक्त करीती ।

      पै मंगलारति जतीसह अर्पुनी ती ।। १७ ।।

      पुष्पांजली उधळिती निजभक्त सारे ।

      तै सिंधु तोष स्विकरी जणु बिंदुभारे ।

      दोन्हीकडे चवरिया धरुनि स्वहस्ती ।

      ढाळोनिया अनुचरे करिती सुभक्ती ॥१८॥

      इत्यादि पूजन विधी करीती समस्त ।

      स्वीकार ते करीतसे उकिडासनस्थ ।

      किंवा विनंतीवश तो प्रभुराज माने ।

      पद्मासना स्विकरी जो करी नित्य दाने ॥ १९ ॥

      छंदी वसंततिलका नमिला मुकुंदु |

      कैवल्यसिंधु प्रभु जो अनिमित्तबंधु ।

      पादारविंद बघण्या झुरतो मुनींद्रु ।

      दावा प्रभु झडकरी तव मूर्तीचंद्रु ॥ २० ॥

       

      इति श्रीपरधर्मे महामोक्षैक साधने श्रीनागार्जुनोपदेशे कवीश्वर आम्नाय दीक्षित श्रीऋषीराजबाबा दर्यापूरकर ॥ तत्सुत श्रीनरेंद्रमुनि अंकुळनेरकर विरचित पूजावसर स्तोत्र ॥

      Parimal Digital
      Vishal Shri Geeta Bhawan
      Sector 52, Chandigarh
      160036
      Chandigarh, India
      Working Hours
      Monday-Friday
      10am-6pm
      Click to Follow
      Contact Us
      [email protected]+91-8146148002+91-9877426467
      Copyright © 2024. All Rights Reserved.
      Designed By: Keshav Mahajan