Parimal Digital
GetStarted
Login
  • Login
    Enable Location Services
    • Website
    • परिमल
    • परिमल स्तोत्र
    • श्रीमदभगवद्गीता
    • पूजनीय गुरुजन
    • Others

    Others

      Parimal Digital
      Parimal Digital
      Login
      • Login
      • Website
      • परिमल
      • परिमल स्तोत्र
      • श्रीमदभगवद्गीता
      • पूजनीय गुरुजन
      • Others
      GetStarted
      अरण्यवास

      अरण्यवास

      1. Home
      2. परिमल स्तोत्र
      3. पूजावसर
      4. अरण्यवास

      अरण्यवास

      अरण्यवास

      (छंद चंपक माला)

      देवच भावी जो निशि दीनी

      अन्य कुवार्ता ऐक न कानी

      दोष न पाहे त्या नयनांनी

      अंतर शुध्द निर्मळ वाणी ॥ १ ॥

      घेत खराटा तो अनुतापू

      झाडून दोषा देत विरामू

      नीरविकारी होवून रानी

      शोधित देवा तो दिनवाणी ॥ २ ॥

      बाभुळ कांटी जाउन पाहे

      तेथ न देवो आणिक पाहे

      तेहि ना तो ये विरहाते

      शांतविता ना कोणी तयाते ॥ ३ ॥

      उत्तर दीसे मूख करौनी

      हस्तक पुढे जोडून दोन्ही

      त्या नयनांसी आणून पानी

      आठवि देवा दुःखिमनानी ॥ ४ ॥

      तो हृदयाचे मंदिर बांधी

      आसन चित्ताचे मन गादी

      त्यावर मुर्ती श्री चक्रधराची

      स्थापन केली ज्ञान रुपाची ॥ ५ ॥

      ताबुळ मूखी उंच कपोळे.

      लंब सुकर्णे नेत्र विशाळे

      कोमल कान्ती तेज झळाळे

      भक्त जनाचे वेधति डोळे ॥ ६ ॥

      नीतळ भाळी चंदन टीळा

      शोभत कंठी ती फुल माळा

      नीत्य दिनीच्या भावून लीळा

      सुंदर मुर्ती पाहतः डोळा ॥ ७ ॥

      || समाप्तः ||

      Parimal Digital
      Vishal Shri Geeta Bhawan
      Sector 52, Chandigarh
      160036
      Chandigarh, India
      Working Hours
      Monday-Friday
      10am-6pm
      Click to Follow
      Contact Us
      [email protected]+91-8146148002+91-9877426467
      Copyright © 2024. All Rights Reserved.
      Designed By: Keshav Mahajan