Parimal Digital
GetStarted
Login
  • Login
    Enable Location Services
    • Website
    • परिमल
    • परिमल स्तोत्र
    • श्रीमदभगवद्गीता
    • पूजनीय गुरुजन
    • Others

    Others

      Parimal Digital
      Parimal Digital
      Login
      • Login
      • Website
      • परिमल
      • परिमल स्तोत्र
      • श्रीमदभगवद्गीता
      • पूजनीय गुरुजन
      • Others
      GetStarted
      करुणाष्टक

      करुणाष्टक

      1. Home
      2. परिमल स्तोत्र
      3. स्तोत्र
      4. करुणाष्टक

      करुणाष्टक


      अनुदिन अनुतापे तापलो कृष्णराया ।

      परम दीनदयाळा निरसी मोहमाया ।

      अचपळ मन माझे नावरे आवरीता ।

      तुजविण शिण होतो धाव रे धाव आता ॥ १ ॥

      भजनरहित कृष्णा सर्वही जन्म गेला ।

      स्वजनजनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला ।

      यदुपति मति माझी आपुलीसी करावी ।

      सकळ त्यजुनि भावे कास तुझी धरावी ॥२॥

      तन मन धन माझे माधवा रूप तुझे ।

      तुजविण मज वाटे सर्व संसार ओझे ।

      विचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी ।

      अचल भजन लीळा लागली आस तुझी ॥३॥

      चपळपण मनाचे मोडिता मोडवेना ।

      सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना ।

      घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा ।

      म्हणवूनी करुणा हे बोलतो दीनवाचा ॥४॥

      जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी ।

      मजवरी करुणेचा यादवा पूर लोटी ।

      तळमळ निववी बा कृष्ण कारुण्यसिंधु ।

      षडरिपु कुळ माझे तोडी यांचा संबंधु ॥५॥

      स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे ।

      यदुपतिविण आता चित्त कोठे न राहे ॥

      जीवलग जीव घेती प्रेत सांडोनि जाती ।

      विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥६॥

      सकळ जन भवाचे आथीले वैभवाचे ।

      जिवलग मग कैचे चालते हेचि साचे |

      विलग विषम काळी सांडिती सर्व माळी ।

      यदुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी ||७||

      उपरती मज कृष्णींजहाली पूर्णकामीं ।

      सकळजनविरामी कृष्णविश्रामधामीं ॥

      घडी घडी मन आतां कृष्ण रूपी भरावे ।

      यदुकुलतिलका बा आपुलेसे करावे ॥८॥

       

       

      इति श्रीकरुणाष्टकसमाप्त

      Parimal Digital
      Vishal Shri Geeta Bhawan
      Sector 52, Chandigarh
      160036
      Chandigarh, India
      Working Hours
      Monday-Friday
      10am-6pm
      Click to Follow
      Contact Us
      [email protected]+91-8146148002+91-9877426467
      Copyright © 2024. All Rights Reserved.
      Designed By: Keshav Mahajan