Parimal Digital
GetStarted
Login
  • Login
    Enable Location Services
    • Website
    • परिमल
    • परिमल स्तोत्र
    • श्रीमदभगवद्गीता
    • पूजनीय गुरुजन
    • Others

    Others

      Parimal Digital
      Parimal Digital
      Login
      • Login
      • Website
      • परिमल
      • परिमल स्तोत्र
      • श्रीमदभगवद्गीता
      • पूजनीय गुरुजन
      • Others
      GetStarted
      प्रबोध चाळिशी प्रारंभ

      प्रबोध चाळिशी प्रारंभ

      1. Home
      2. परिमल स्तोत्र
      3. स्तोत्र
      4. प्रबोध चाळिशी प्रारंभ

      प्रबोध चाळिशी प्रारंभ

       छंद :- मालिनी

      जय जय यदुपाळा दत्त पंथाद्य मूळा ।

      जय अवर स्विकारा बावना सिद्धि मेळा ||

      विमल पर दयाळा त्वां नमो आर्य लीळा ।

      नमन पतितपाळा चक्रपाणी कृपाळा ॥१॥

      बडबड करितोसी देव कां नाठवीसी ।

      बहुत रचमचेसीं वाउगे जन्म देसी ॥

      स्मरण मनन नाही खंती आली विभूसी ।

      त्यजुनि सकळ धंदा प्रार्थिजे श्रीप्रभुसी ॥२॥

      छंद :- भुजंग प्रयात

      अरे अद्धमा दैवहीना निराशा ।

      उदासा प्रभु होऊनी तूज कैसा ॥

      अरे जन्मूनी व्यर्थ भूभार जाला ।

      प्रभुराज सांडोनिया दूर गेला ||३||

      अनिष्टासि रे जोडितां जन्म गेले । कृपाळासि म्या अंतरी शीणवीले ॥

      पुढे जोडिल्यां निर्य राशी अपारां । कसा निर्लजू जन्मलासी गवारां ॥४॥

      नसे एकनिष्टा मनी पै जनांसी । परत्रु पुढा सत्य कैसे तयांसी ॥

      दिसे चिन्ह पै युक्त साधु जनांचे । परी अंतरी गुण इंद्रावनाचे ॥५॥

      करी अन्यवार्ता कुचेष्टा परींची । नये नाम वाचेसि कै अद्धमासी ।

      बहु द्रव्यलोभासी हे चित्त धावे । सदा इंद्रियार्थादिकांते लुलावे ॥६॥

      छंद :- इंद्रवजा

      असत्य बोलो सकलां जनांसी । तैसाच बोलो परमार्गीकांसी ||

      वाहोनि आना मग साधनांसी । ऐसा असत्य बहु पापरासी ॥७॥

      छंद :- कामदा

      कृतघ्नु पापिया नित्य नरकी । असत्यही वदो गोष्ट आसकी ॥

      लटीकु भिक्षुका दोष घेऊनी । विभु उदास तो खंती येऊनी ॥८॥

      दोष विषयी सिद्ध उपमा । तेही तुच्छ पै त्यासि हे सीमा ||

      दोषवृद्धि हे थोर पै दिसे । त्यासि लेखितां अंतही नसे ॥९॥

      छंद :- इंजवज्रा

      होउनी जन्मू मज अधमाला । सांडोनिया तो प्रभु दूर गेला ॥

      सांभाळ माझा करी कोण आता । कां, बा अव्हेरु प्रभु दीननाथा ॥१०॥

      जेने क्रिये तूं मजसी प्रसन्नू । तें नाचरे मी विहीले प्रमाणू ॥

      सव्वीस पैं सर्वही सांडियेले । ते सात वाक्ये स्मरणी विहीलें ॥११॥

      अठ्ठाविसी साधन साधु कष्टी । त्या पंधरातेहि न मी अनुष्टी ॥

      पादांश त्याचा न घडेच काही । ऐसा कुबुद्धि मजविण नाही ।।१२।।

      छंद:- मालिनी

      न च करी मजलागी विहिले जी परेशा ।

      न करी च तव वाक्ये गुंतलो डिम्भफासा ।।

      न कही भजत मार्गा वंचलो सर्व अर्था ।

      म्हणौनि तुज लागी खंत आली समर्था ||१३||

      छंद :- शार्दूल विक्रीडित

      साते सोडूनि चार अंतरी धरी ते चार होती तुला ।

      चौदांचे करी वर्तन प्रतिदिनी ऐसा विभू बोलिला ॥

      वाक्ये लंघूनी आचरे जीव सदां ते दुःख नाही कदां ।

      द्वेषी नष्ट कुवेसनी विपरितू वर्मी अपेशी सदां ॥१४॥

      छंद :-मालिनी

      सकल वचन हेतूं ठाकलो मी कुपात्रा । म्हणौनि दूर गेला वंचलों जी

      परत्रा ।।

      रव व कुहरीचे जाच होतील भारी । कवण मज निमित्ते विणवी श्री भवारी ॥ १५ ॥

      छंद :- भुजंग प्रयात

      वसो यासि पैं सोडूनि मुक्त केले । कृपाळा त्रिशुद्धी तुम्हा विणवीले ||

      तसा मार्ग मी ही न जोडे कुबुद्धी । आता तारिता कोण माते भवाब्धी ॥१६॥

      अगा स्वामिया धाव गा धाव धावे । भला दास मी शीघ्र तूं पाव पावे 

      जसी गौतमी बुडताये यल्होसी । प्रभु देऊनी तारीले श्रीकरांसी ॥ १७ ॥

      तसे तार मातें कृपाळा भवाब्धि । अगा नासूनी सर्व माझी कुबुद्धी ॥

      करी सर्व क्षमा गुणाब्धि दयाळा । कृपाळा तुझें नाम स्वामी मयाळा ॥१८॥

      छंद :- इंद्रवजा

      दैवद्विकल्पादिक सर्व स्थाने । हिंसादिके भक्षित सर्व अन्ने ॥

      काठिण्यता जाणूनि अंतराची । तेणे नसे आवडी साधनांची ॥१९॥

      जोडितसो निरय नित्य सदाही । ना आचरो ते वहिले कदाही ।

      तूं मागसी जन्म सदा परेशा । नेदीच मी वंचक पापी ऐसा ॥ २० ॥

      अनंता सृष्टी द्रोही मी देवराया । आलो असा लोटित याचिठाया ।

      प्रस्तुतही द्रोही मी साधकांसी । पुढा गती होइल जाणु कैसी ॥२१॥

      छंद :- कामदा

      त्रिक जोडिला त्रिक सांडिला । त्रिक पुर्विचा तो अनुष्टिला ॥

      चौक मांडिला चौक सांडिला । चौक दानिचा तोची द्रोहीला ॥२२॥

      छंद :- पंचचामर

      अधिकवृति वर्तता गुरुसी खंती आणिली । कुशब्द बोल भिक्षुका अधीक ते दुणावली ॥

      दशाभरेण मानसी आचारवृती सांडिली । म्हणौनि खंती अंतरी दयाळुवा दुणावली ॥ २३ ॥

      छंद :- शालिनी

      बाळत्वाचा पाळूनी थोर केला । पुढां योग्य होइ पैं स्वामियाला || तें म्यां पुढां नित्यही जोडियेले ।

      निमित्याचे कष्टही व्यर्थ गेले ॥२४॥ त्याचे पोटी दायपसाय होती ।

      तें म्यां पुढां जोडिल्या निरय जाती ।। हंसा वंशी वायसा जन्म जाले ।

      तेणे पुढां गुण ते दाखविले ॥ २५ ॥

      छंद :- मालिनी

      त्यजुनि मज निमित्ते देव धामास गेला । कवण मज निमित्ते विणवी स्वामियाला ||

      गुरुकुळ मज ठावों नेदिती पामराला । जीवन कवण कार्य व्यर्थ भू भार जाला ॥ २६ ॥

      छंद :- इंद्रवजा

      केल्या क्रियेचा अनुताप नाही । वाढोनी देही प्रसवे सदाही ।

      वर्मे स्पर्श नित्य मी बोलताये । बावीसु दोषांसी अनुष्टिताये ॥ २७ ॥

      छंद :- भुजंगप्रयात

      जरी विनवू स्वामियालागि काही । तरी अदमासी कदा मुख नाही ॥

      जरी यादवेंद्रा स्मरों ना सदाही । तरी तो कृपाळू नुपेक्षी कदाही ॥ २८ ॥

      छंद :- इंद्रवजा

      सृष्टी रचोनी मज अधमाला । देवोनि ज्ञाना उतराई जाला ॥

      दोन्ही पथाते मज जाणविले । चतुर्विधाचे भय दाखविले ॥ २९ ॥

      छंद :- शालिनी

      त्यांच्या वाक्या सर्वही भंगु केला । आता काये विणवू स्वामियाला ॥

      निर्लज्जासी लाज नाहींच कैसी । द्रोहियासी ईश्वरु देतु फासी ॥३०॥

      तेव्हा माते कोण राखे दयाळा । आकांतीचा सोयरा तूं मयाळा ॥

      ये रे देवा धाउनी शीघ्र पाही । माते दुजा रक्षितां आन नाही ||३१|

      |ंद :- कामदा घालितां मला दुःख जोहरी । धावरे सख्या पाव लौकरी ॥

      तूज वांचोनी कोण रक्षिता ।  नाही दुसरा सृष्टि पाहता ||३२||

      तारिले बहू ज्ञान देउनी । कीर्ति ही तुझी स्फारली जनी ॥

      त्यासि हे प्रभो अंति तारिसी । प्रेम देउनी दुःख नासिसी ||३३||

      छंद :- इंद्रवजा

      नासूनि दुःखे मज पापियाची । सन्निध देई पद पंकजाची ॥

      तू भेट देई कृपया अगाधा । क्षमा करावी सकलापराधा ||३४||

      छंद :- शालिनी

      केव्हां केव्हां भेट देसी दयाळा । केव्हां केव्हां तुज देखैन डोळा ॥

      चांपेगौरा नागरा वेधमूर्ती । नित्यानंदा चित्परानंतकीर्ति ॥ ३५ ॥

      छंद :- इंद्रवजा

      देवोनि भेटी मज निववावे |

      संसार दुःखातून सोडवावे ॥

      देवोनि प्रेमा मज किंकरासी ।

      नासोनियां सर्वहि दुःखरासी ||३६||

      छंद :- मालिनी

      जय जय करुणेशा विनवू थोर आशा । जय जय भवनाशा तारका श्रीनिवाशा ।

      भवर कुळ अरीचे काढी चैतन्यनाथा । चरण शरण तुझे सर्व भावे अनन्ता ||३७||

      शिवसुत मुनिराजे जोडिली अन्यथत्वे । परविध प्रसन्नत्वे दाविली ज्ञान तत्त्वे ॥

      अगणित गुण त्यांचे काय उत्तिर्ण व्हावे । तनमन प्रभू पादे कुरवंडी करावे ॥ ३८ ॥

      विनवित सुत त्याचा नाम 'गोविंद' ज्यासी । शरण पदिं प्रभूच्या मागतो प्रेमरासी ॥

      अवगुण प्रभू माझे सर्व क्षमा करावें । शरणगत तुम्हां मी निज दास्य देयावे ॥३९॥

      छंद :- दोधक

      गौतमी उत्तर नाशिक देशीं । ग्राम सुकिनेही वस्ती प्रभूसी ॥

      स्थान आदित्य तिये स्थळवासी । तेच असे उपनाम तयासी ॥४०॥

      Parimal Digital
      Vishal Shri Geeta Bhawan
      Sector 52, Chandigarh
      160036
      Chandigarh, India
      Working Hours
      Monday-Friday
      10am-6pm
      Click to Follow
      Contact Us
      [email protected]+91-8146148002+91-9877426467
      Copyright © 2024. All Rights Reserved.
      Designed By: Keshav Mahajan